शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत अनुकंपावर ६२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 20:23 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी

ठळक मुद्देकागदपत्रांची छाननी : समुपदेशाने रिक्त जागांवर नेमणूकरिक्तपदांच्या तुलनेत वीस टक्के जागा अनुकंपातून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला जिल्हा परिषदेचा अनुकंपातत्त्वावरील कर्मचारी भरतीची प्रक्रिया मंगळवारी प्रशासनाने पूर्ण केली. जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या जागांच्या २० टक्के जागा भरण्यास शासनाने अनुमती दिल्याने ६२ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून तत्काळ त्यांना समुपदेशाने नियुक्ती देण्याची कार्यवाही एकाच दिवसात पूर्ण झाल्याने अनुकंपा उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते. तथापि, शासनाने सर्व प्रकारच्या कर्मचारी भरतीवर निर्बंध लादल्याने अनुकंपा भरतीला हिरवाकंदील मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळण्याच्या आशेवर असलेल्या उमेदवारांचा धीर सुटत चालला होता. यातील काहींची वयोमर्यादा संपुष्टात येण्याची चिन्हे होती, तर हमखास नोकरी मिळण्याच्या अपेक्षेमुळे दुस-या नोकरीसाठी प्रयत्न करण्यातही अडचणी निर्माण होत होत्या. राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी अनुकंपातून रिक्त जागा भरण्याची अनुमती जिल्हा परिषदांना दिली असली तरी, त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागाने स्वतंत्र वेगवेगळे शासन आदेश जारी केल्यामुळे प्रशासनापुढे संभ्रम निर्माण झाला होता. रिक्तपदांच्या तुलनेत वीस टक्के जागा अनुकंपातून भरण्याची मुभा देताना शासनाने मात्र अनुकंपाची सेवाज्येष्ठता यादी न डावलण्याचे स्पष्ट आदेश दिल्यामुळे प्रशासनापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासाठी शासनाकडे मार्गदर्शनही मागविण्यात आले. परंतु अद्याप शासनाने त्यास होकार कळविलेला नाही. असे असले तरी, अनुकंपा उमेदवारांचा वाढता दबाव पाहता, प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ६३ कर्मचा-यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी पात्र ठरू पाहणा-या कर्मचा-यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व दुपारनंतर या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येऊन जिल्ह्यातील रिक्त असलेल्या जागांवर समुपदेशनाने नेमणुकाही करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद