शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणगाव, गंगादरवाजा येथेच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन

By admin | Updated: September 26, 2015 21:59 IST

अंगणगाव, गंगादरवाजा येथेच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन

येवला : गणेशोत्सव परंपरेत पण कायद्याचे उल्लंघन न करता साजरा करा, असे आवाहन करीत रात्री १२ वाजेच्या आत गणेश विसर्जन मिरवणूक आटोपण्याचे आवाहन येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले. अंगणगाव येथील अहल्योदवी घाट तसेच गंगादरवाजा येथे तयार केलेल्या गणेशकुंडातच विसर्जन करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा, असे आवाहन तहसीलदार शरद मंडलिक यांनी केले.गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमिटी व गणेश मंडळ सदस्यांच्या बैठकीत मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, तहसीलदार शरद मंडलिक, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे आदिंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी आदिंनी शिस्तीत मिरवणूक पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांनी आझाद चौकात प्रत्येक मंडळाला अधिक वेळ मिळावा, लक्कडकोट भागातील झुलत असलेल्या इलेक्ट्रिक तारांना ताण देऊन ओढून घ्याव्यात या महत्त्वपूर्ण सूचना कार्यकर्त्यांनीही केल्या. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी शहराला पाणीपुरवठा करावा, वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नये, पोलिसांनी मंडळांना सहकार्य करावे, पालिकेने मुख्य विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवावे तसेच बंद पथदीप सुरू करावेत आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांनी, आमच्या मंडळाचे यंदाचे मानाचे १२७वे वर्ष असून, आम्ही वेळेत मिरवणुकीला सुरुवात करू, असे सांगतानाच आझाद चौकात कसरती व खेळ सादर करण्यासाठी इतर मंडळांनाही वेळ मिळेल याची काळजी घेऊ, असे स्पष्ट केले. भाजपाचे शहराध्यक्ष मनोज दिवटे यांनी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यापेक्षा नम्रतेने सूचना कराव्यात, असे आवाहन केले. गणेशोत्सव व ईद शांततेत साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल येवलेकरांचे पोलीस अधिकाऱ्यांनी आभार मानले. विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पडेल, असा विश्वास यावेळी उपस्थित असलेले आधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. योवळी प्रमोद सस्कर, मध्यवर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोर सोनवणे, भूषण शिनकर आदिंनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन राहुल लोणारी यांनी केले.(वार्ताहर )