जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी विभागाच्या वतीने आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST2020-12-04T04:40:46+5:302020-12-04T04:40:46+5:30

नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून दरवर्षीप्रमाणे जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण ...

Appeal on behalf of the department for district sports awards | जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी विभागाच्या वतीने आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी विभागाच्या वतीने आवाहन

नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून दरवर्षीप्रमाणे जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. त्याबाबत गुणवंत खेळाडू पुरुष, महिला, दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या प्रकारात पुरस्काराकरिता अटींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या छायांकित कागदपत्रांसह सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक, कार्यकर्ता यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यातच कार्यालयीन वेळेत दि. २८ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले आहे.

Web Title: Appeal on behalf of the department for district sports awards