शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला अतिक्रमण विरोधी मोहीम

By admin | Updated: January 5, 2016 00:43 IST

पालिकेची कारवाई : अनधिकृत ओटे; पत्र्याचे शेड केले उद्ध्वस्त

नाशिकरोड : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने व्यावसायिक संकुलातील अनधिकृत ओटे, पत्र्याचे शेड, जगताप मळा येथील शेड व जेलरोड पंचक येथील अनधिकृत तारेचे कुंपण जमीनदोस्त केले. यामुळे अनधिकृत अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी दुपारी रेजिमेंटल प्लाझामागील गायकवाड मळा येथील व्यावसायिक ईश्वर संकुल येथे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. प्रतीक कुमार अ‍ॅण्ड कंपनी, अक्षय एम्पोरियम, साईराम सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस, सायंतारा, मोबाइल रिपेअरिंग, बालाजी इस्टेट कन्सल्टन्सी आदि सात दुकानांपुढील अनधिकृत पक्के ओटे व शेड आदिंचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. तसेच ईश्वर संकुलच्या गच्चीवर क्वालिटी स्वीट््स या दुकानाच्या असलेल्या पत्र्याच्या शेडमधील कारखानादेखील काढण्यात आला. गायकवाड मळा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते.जगताप मळा पाईन्स सोसायटी येथे मोजेस यांच्या मालकीचे वाहन पार्किंगसाठी असलेले अनधिकृत पत्र्याचे शेड व वीट बांधकाम तसेच जेलरोड पंचक भैरवनाथ नगर येथे रस्ता असलेल्या जागेवर टाकण्यात आलेले पक्के तार कम्पाउंड जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. नाशिकरोड परिसरात मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करताच अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणून गेले आहे. सदर मोहीम मनपा सहायक आयुक्त सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी कुसूम ठाकरे, विभागीय अधीक्षक सुधाकर वसावे, सहायक अधीक्षक एस.टी. कारवाल, अर्जुन भावले, कैलास भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. (प्रतिनिधी)