दुसरेही कन्यारत्न झाल्याने विवाहितेचा जाळून खून

By Admin | Updated: November 18, 2016 00:55 IST2016-11-18T00:58:30+5:302016-11-18T00:55:42+5:30

कूपखेड्यातील घटना : पतीला अटक, सासरची मंडळी फरार

Another girl burnt to death due to daughter-in-law marriage | दुसरेही कन्यारत्न झाल्याने विवाहितेचा जाळून खून

दुसरेही कन्यारत्न झाल्याने विवाहितेचा जाळून खून

जायखेडा : दुसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली म्हणून बागलाण तालुक्यातील कूपखेडा येथील सोनाली ठाकरे या विवाहितेस सासरच्या मंडळींनी जाळून टाकल्याची घटना समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित पतीला बुधवारी ताब्यात घेण्यात आले असून सासू, दीर व नणंद फरार आहेत.
देवळा तालुक्यातील भऊर येथील माहेर असलेल्या सुनीताचा विवाह कूपखेडा येथील शरद ठाकरे याच्याशी झाला होता. त्यांना पहिली मुलगी आहे. वंशाला दिवा हवा म्हणून तेव्हापासून सासरच्या मंडळीने नाके मुरडली होती. पहिली मुलगी झाल्यानंतर पुन्हा अडीच वर्षांच्या कालावधीनंतर मुलगीच झाली. त्यामुळे सासरची मंडळी नाराज होती. या नाराजीमुळेच सोनाली बाळंत झाल्यापासून दोन अडीच महिने माहेरीच होती. त्या मुलीला पाहण्यासाठी किंवा सोनालीला आणण्यासाठी कोणीही भऊर येथे गेले नव्हते. दरम्यान, तिला सासरी नेण्यासाठी तिचा दीर श्यामकांत ठाकरे गेले होते. त्यांनी सोनालीला कूपखेडा येथे आणल्यानंतर चौथ्याच दिवशी तुमची मुलगी आजारी असल्याचे माहेरी कळविण्यात आले. माहेरची मंडळी आल्यावर त्यांना सोनाली जळाल्याने मयत झालेल्या अवस्थेत आढळून आली. (वार्ताहर)

Web Title: Another girl burnt to death due to daughter-in-law marriage