शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् सभेची गर्दी ओसरू लागली

By admin | Updated: October 13, 2014 00:50 IST

...अन् सभेची गर्दी ओसरू लागली

नाशिक : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची सभा तब्बल तीन तास उशिराने सुरू झाल्याने उपस्थित महिलावर्ग मोठ्या संख्येने सभा सुरू होताच परतू लागल्याने भाजपाच्या गोटात चिंता पसरली होती. दुपारी एकनंतर भरगच्च भरलेले दादासाहेब गायकवाड सभागृह शेवटी शेवटी अर्ध्यावर आल्याचे चित्र होते.भाजपाच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृहात दुपारी बारा वाजता गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुळातच एक वाजेनंतर सभागृहात गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. मधल्या काळात मग सुभाष घिया, दामोदर मानकर, भारती बागुल, गिरीश पालवे, प्रा. कुणाल वाघ, संभाजी मोरूस्कर व उमेदवार देवयानी फरांदे यांना बोलण्याची संधी आयोजकांनी दिली. बोलून बोलून काय बोलणार, अशा मन:स्थितीत वक्त्यांनी मनोगत मांडण्यास सुरुवात केली. देवयानी फरांदे यांनी तर भाषणात अनेक वेळा आक्रमकपणा आणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शेवटी व्यासपीठावरूनच त्यांना सांगावे लागले, आता तरी कोणाला तरी बोलायला पाठवा. त्यानंतर रवि कुलकर्णी यांनी जबाबदारी सांभाळली. मात्र दोन मिनिटांतच त्यांनी भाषण आटोपते घेतल्यानंतर मग शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी आपल्या भाषणातून मनसेसह राष्ट्रवादीला लक्ष्य केले. इतकेच नव्हे, तर आमचे दोन आकडी उमेदवार निवडून येतीलच, असा दावा माध्यमांकडे पाहून केला. मात्र जसजशी वेळ वाढत गेली तसतशी सभागृहातील महिला व युवतींची गर्दी ओसरू लागली. शेवटी शेवटी तर जेव्हा आनंदीबेन पटेल भाषणास उभ्या राहिल्या त्यावेळी सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्याही झाल्या होत्या. सभेला तीन तासांचा झालेला विलंबच कार्यकर्त्यांचा अंत पाहून गेल्याची चर्चा उपस्थितांत होती. (प्रतिनिधी)