शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनोरु ग्णांवरील उपचारांना प्राचीन इतिहास

By admin | Updated: February 20, 2017 23:03 IST

नाडकर्णी : काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यान

नाशिक : भ्रमिष्टावस्था, अतिनैराश्य, उन्माद आदिंचे मनोरुग्ण विविध कारणांनी योग्य औषधोपचाराने त्यांची अवस्था निदान आटोक्यात राहू शकते. समाजात यातल्या काही जणांचे पुनर्वसनही करता येते. मनोविकारांवरचे उपचार यशस्वी होत असल्याची उदाहरणे अतिप्राचीन काळापासून दिसून येत असून, मनोरुग्ण इतरांप्रमाणेच सामान्य जीवन जगू शकतात, असे मत मानसशास्त्रीय आरोग्य संस्थेचे संचालक आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले.  शंकराचार्य संकुल येथील डॉ. कूर्तकोटी सभागृहात कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयातर्फे मन वढाय वढाय कार्यक्रमात ‘मानस शास्त्रातील रोमांचक प्रवास’ विषयावर आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राच्या प्राचीन इतिहासावर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षस्थानी एस्पालियर द एक्सपेरिमेंटल स्कूलचे संचालक सचिन जोशी होते. यावेळी बोलताना नाडकर्णी यांनी शरीर आणि मन वेगळे नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून दोन्ही शरीराचा भाग असल्याचे सांगितले. ऐतिहासिक कालखंडात हिपोक्रॅटीस, मध्ययुगातील रेनिडेकोरटेस फ्रॉइड, पीनल आदि वैद्यकीय शास्त्रातील संशोधकांच्या अभ्यासातील निष्कर्ष उलगडून सांगताना नाडकर्णी यांनी मानस आरोग्य शास्त्राची आणि भौतिकशास्त्राच्या प्रगतीचे वर्णन केले. आजमितीला वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांच्या संशोधनांचा इतिहासही त्यांनी सांगितला. पहिल्या महायुद्धातील व दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगांसह शीत युद्धाच्या कालखंडातील घटना व्हिएतनामच्या युद्धातील प्रसंग सांगून त्यांनी मानसिक आरोग्य शास्त्राच्या प्रगतीविषयी माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अनघा काण्णव यांनी केले. आदिती गिजरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)