शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

काळाराम मंदिरात आमीर!

By admin | Updated: September 17, 2014 00:11 IST

काळाराम मंदिरात आमीर!

पंचवटी : येथील श्री काळाराम मंदिरात राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘पीके’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. सिनेअभिनेता आमीर खान याची या चित्रपटात मुख्य भूमिका असून, स्वत: आमीर खान चित्रीकरणासाठी आल्याचे समजताच त्याला बघण्यासाठी शेकडो चाहत्यांनी काळाराम मंदिरात गर्दी केली होती. दरम्यान, आमीर खान चित्रीकरणासाठी आला असला तरी काळाराम मंदिराचे विश्वस्त आणि संस्थान याबाबत अनभिज्ञ होते. देवस्थानच्या वतीने चित्रीकरणासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे विश्वस्तांनी स्पष्ट केले. विश्वस्त मंडळाची परवानगी नसतानाही चित्रीकरण सुरू असल्याने काही विश्वस्तांनी तातडीने धाव घेऊन चित्रीकरणासाठी संस्थानने लेखी परवानगी दिली आहे का याची विचारणा करत, परवानगी नसेल तर चित्रीकरण करता येणार नाही असे सांगितल्याने काही काळ गोंधळ झाला होता. अखेर संबंधितांनी चित्रीकरणासाठी श्री काळाराम संस्थानच्या नावे २५ हजार रुपयांची देणगी चित्रीकरणासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आल्यानंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले. पोलीस प्रशासनानेदेखील चित्रीकरणासाठी सशुल्क पोलीस बळ दिले होते. ‘पीके’ या चित्रपटात आमीर खान हा मंदिर परिसरात लोटांगण घालत असल्याच्या दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले. काळाराम मंदिरानंतर श्री नारोशंकर मंदिर परिसरातही चित्रीकरण झाले. तसेच मंगळवारी दिवसभरही चित्रीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले. चित्रीकरण सुरू असताना भाविकांना मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई केल्याने भाविक संतप्त झाले होते. (वार्ताहर)