सिडकोत रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप

By Admin | Updated: November 17, 2016 22:30 IST2016-11-17T22:28:19+5:302016-11-17T22:30:04+5:30

उपक्रम : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांचा सत्कार

Allocation of uniform to CIDCO rickshaw drivers | सिडकोत रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप

सिडकोत रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप

सिडको : शालेय विद्यार्थ्यांची अखंडित सेवा करणाऱ्या सिडको विभागातील रिक्षाचालकांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करून मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
सिडकोसह परिसरातील रिक्षाचालक हे शालेय विद्यार्थ्यांची अखंडित वाहतूक करीत असून, एकप्रकारे ते विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांच्याशी वागतात. बहुतांशी विद्यार्थी हे रिक्षाचालकांना काका, मामा तसेच दादा म्हणूनच हाका मारतात. यामुळे त्यांचे व विद्यार्थ्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले आहे. रिक्षाचालक हे अहोरात्र मेहनत करून सेवा देत असतात.
यातच काही कारणास्तव बससेवा बंद असल्यावर तसेच मोर्चा व शहर बंद असले तरीदेखील ते अखंड सेवा देतात. रिक्षाचालकांच्या कार्याचा गौरव व माणुसकीची थाप म्हणून सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २९ मधील शिवसेनेचे पदाधिकारी देवा वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बुद्धासिंग चौहान, योगेश पाटील, नारायण मंडलिक, सुनील पाटील, अशोक चव्हाण, जगदीश अहिरे, युवराज चौधरी, अजय पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Allocation of uniform to CIDCO rickshaw drivers