शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच कामांची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार

By admin | Updated: November 15, 2014 00:41 IST

सर्वच कामांची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार

नाशिक : सिंहस्थाअंतर्गत शहरात झालेल्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून, झालेल्या आणि होणाऱ्या अशा सर्वच कामांची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार असून, ठरलेल्या दर्जाप्रमाणे कामे नसतील अथवा त्यात भ्रष्टाचार झाल्याचे उाडकीस आल्यास अशा ठेकेदारांवर कारवाई करणार असल्याचे संकेत आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कामांसंदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी हे संकेत दिले. याआधी त्यांनी गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. त्यात सिंहस्थासाठी बाहेरून येणारी वाहने कोणत्या ठिकाणी थांबतील, त्यांना आत सोडण्यासाठी कोणते रस्ते उपलब्ध आहेत यांसह भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणाऱ्या ६० घाटांची पाहणी केली. सुरू असलेल्या कामांत घाटावर बांधण्यात येत असलेल्या घाटावरील कॉँक्रिटीकरणात जर दगडी रंग वापरला तर त्याला नैसर्गिकतेचा स्पर्श होईल. त्यामुळे तेथे बदल करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सिंहस्थाची सुरू असलेली कामे पूर्ण होतील. त्यासाठीच मी आलो असून, निधीची कमतरता भासली नाही तर कामे नियोजित वेळेतच पूर्ण होतील, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला. झालेल्या कामांचा दर्जा गुणवत्ता नियंत्रकांकडून तपासून घेतला जाणार असून, त्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचेही आयुक्त म्हणाले. जमीन अधिग्रहणासंदर्भात भूमिका मांडताना सिंहस्थ मार्गातील सर्वच अतिक्रमणे काढणार असून, ज्या जागांची प्राथमिकता असेल त्याच रस्त्यांच्या अधिग्रहणाला पैशानुसार प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)