शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

१०७ विद्यार्थ्यांच्या घरात आकाशवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 10:48 PM

जानोरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाने ‘डोनेट अ डिव्हाईस’ हे अभियान जिल्हाभर सुरू असून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल , दूरदर्शन संच, लॅपटॉप, रेडिओ दान करून त्यांचे अध्ययन सुकर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याच उपक्र माचा एक भाग म्हणून तळेगाव दिंडोरी केंद्रातील अक्र ाळे, ढकांबे, खतवड, इंदोरे, पिंपळनारे, मानोरी, तळेगाव दिंडोरी व वनारवाडी शाळांतील सर्व शिक्षक तसेच केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केंद्रातील १०७ गरजू विद्यार्थ्यांना रेडिओ वितरित केले.

ठळक मुद्दे‘डोनेट अ डिव्हाईस’ : तळेगाव दिंडोरी केंद्रात उपक्रम

जानोरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाने ‘डोनेट अ डिव्हाईस’ हे अभियान जिल्हाभर सुरू असून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल , दूरदर्शन संच, लॅपटॉप, रेडिओ दान करून त्यांचे अध्ययन सुकर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याच उपक्र माचा एक भाग म्हणून तळेगाव दिंडोरी केंद्रातील अक्र ाळे, ढकांबे, खतवड, इंदोरे, पिंपळनारे, मानोरी, तळेगाव दिंडोरी व वनारवाडी शाळांतील सर्व शिक्षक तसेच केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केंद्रातील १०७ गरजू विद्यार्थ्यांना रेडिओ वितरित केले.ठिकठिकाणच्या शाळांमध्ये गटशिक्षण अधिकारी बी. डी. कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे, स्थानिक शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे रेडिओ गरीब विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. दररोज सकाळी ९.४० वाजता १०१.४ या वाहिनीवर विद्यावाहिनीच्या शैक्षणिक कार्यक्र मांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्र मात मुख्याध्यापिका पुष्पा डावरे, सुनंदा जाधव, उल्का जाधव, चंद्रकांत पवार, धनंजय आहेर, प्रकाश भामरे, विलास जमदाडे, सुनंदा निकम, माधुरी थोरात, रविंद्र शिंदे, भाऊसाहेब नांदूरकर, रमेश मोरे, अशोक देवरे, राहुल सोनवणे, एन. जे. आहेर, चेतनकुमार घरटे, कल्पना गांगुर्डे, रूपाली कराड, प्रमिला जाधव आदींसह केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.वाड्या-वस्त्यांवर अध्यापनकोवीड १९ च्या पाशर््वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरीही शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत तळेगाव दिंडोरी केंद्रातील जि. प. च्या सर्व आठही शाळांमधील शिक्षक आॅफलाईन व आॅनलाईन माध्यमातून अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यामध्ये वॉटस अप, झूम मिट, गुगल मिट तसेच सोशल डिस्टन्स ठेवून वाडी, वस्तीवरील समाजमंदिर, पडवी अथवा मोकळ्या जागेत अध्यापन केले जात आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी