शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

गोदा युनियनकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

By admin | Updated: September 6, 2016 22:32 IST

गोदा युनियनकडून शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या वतीने कार्यक्षेत्रातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १९७८ साली स्थापन झालेल्या गोदा युनियनचा सहकार क्षेत्रात राज्यात दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून लौकिक आहे. विविध योजना राबवून सभासदांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेने मोठे काम केले आहे. याचाच एक भाग म्हणून विविध अडचणींचा सामना करताना शेतीत नवनवे प्रयोग राबविणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देत कौतुकाची थाप मारली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे व संस्थापक बरकत सोहील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, संचालक मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सभासदांकडून स्वागत होत आहे. निवड समितीने या कृषी पुरस्कारासाठी वडझिरे येथील तुकाराम राजेंद्र शेळके (प्रथम), नायगाव येथील दिगंबर भागुजी कातकाडे (द्वितीय) तर देशवंडी येथील नवनाथ सुलाजी बर्के (तृतीय) या शेतकऱ्यांची निवड केली. माजी मंत्री दिघोळे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. जोगलटेंभी येथील तरुण शेतकरी विशाल सुदाम तांबे, नायगाव येथील दिनकर लक्ष्मण सौंदाणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले. नायगावचे माजी सरपंच पी.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी बोडके (वडझिरे), दत्तात्रय तांबे (जोगलटेंभी), बाळासाहेब कापडी (देशवंडी), रघुनाथ लहाने (सोनगिरी), विक्रम दिघोळे (जायगाव) यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश डोमाडे, संचालक दगू दिघोळे, मीननाथ कातकाडे, संतू पानसरे, कैलास गिते, बाबजी पाटील, रमेश लहाने, योगेश गायकवाड, मीना कातकाडे, विठाबाई लहाने, दिलीप पवार आदिंसह सभासद उपस्थित होते. (वार्ताहर)