शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात आदिवासीच कर्मचारी राज्यपालांचा फतवा : यंत्रणेकडून आढावा

By admin | Updated: June 25, 2014 00:12 IST

आदिवासी भागात आदिवासीच कर्मचारी राज्यपालांचा फतवा : यंत्रणेकडून आढावा

नाशिक : आदिवासी भागात मूलभूत सोयी-सुविधा देण्याबरोबरच तेथील जनतेचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने यापुढे आदिवासी भागात आवश्यक असलेल्या शासकीय खात्यांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे, त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यपालांचे उपसचिव परिमलसिंह यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन यापुढे या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना केल्या आहेत. विशेष करून तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, भूमापक, वन कर्मचारी, शिक्षक, कृषी सहायक अशा आदिवासींच्या जीवनमानाशी संबंधित असलेल्या शासकीय खात्यांचा समावेश आहे. आदिवासी दुर्गम भागात बिगर आदिवासी शासकीय कर्मचारी काम करण्यास धजावत नाहीत, परिणामी तेथील जनतेला योग्य त्या सुविधा व सोयी मिळण्यात अडचणीत निर्माण होतात. त्यामुळे अशा खात्यांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांचीच भरती करून त्यांना तेथेच नेमणुका दिल्या जाव्यात, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. उपसचिव परिमलसिंह यांनी, सर्वच खात्यांमध्ये आदिवासी विभागात रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेतला. यापुढे रिक्त पदांची भरती करताना, आदिवासी भागांसाठी आदिवासी कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.