कार्यकर्त्यांचा उत्साह, पोलिसांची दमछाक

By Admin | Updated: May 17, 2014 00:43 IST2014-05-17T00:01:31+5:302014-05-17T00:43:51+5:30

नाशिक : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. विसाव्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी उमेदवारांसोबत मतमोजणी केंद्रावर एकच गर्दी केली होती; परंतु उमेदवारासह दोन किंवा तीनच कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याचे आदेश असल्याने पोलिसांना त्यांना आवरणे कठीण झाले होते.

Activists' enthusiasm, police tension | कार्यकर्त्यांचा उत्साह, पोलिसांची दमछाक

कार्यकर्त्यांचा उत्साह, पोलिसांची दमछाक

नाशिक : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. विसाव्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी उमेदवारांसोबत मतमोजणी केंद्रावर एकच गर्दी केली होती; परंतु उमेदवारासह दोन किंवा तीनच कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याचे आदेश असल्याने पोलिसांना त्यांना आवरणे कठीण झाले होते.
दुपारी दोन वाजेच्या दरम्यान नाशिक, दिंडोरी मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यामुळे विजयी उमेदवार हेमंत गोडसे व हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच गर्दी केली होती. मात्र सर्वच कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सोडणे शक्य नसल्याने पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार गाठले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात किरकोळ प्रमाणात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनीच माघार घेत कार्यकर्त्यांना उमेदवारासोबत जाऊ दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Activists' enthusiasm, police tension