शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कॉफी शॉप चालकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 12:43 AM

सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयासमोर असलेल्या सिक्रेट कॉफी शॉप चालकावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देसिन्नर: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका सिन्नर : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयासमोर असलेल्या सिक्रेट कॉफी शॉप चालकावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी कारवाई केली.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता कॉफी शॉमध्ये गर्दी जमविल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी कॉफी शॉप चालक सतीष साजनसिंग बिसेन (१९), रा. अपना गॅरेज झोपडपट्टी, सिन्नर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सिन्नर महाविद्यालयासमोर सतीश बिसेन याचे सिक्रेट कॉफी शॉप असून, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे संबंधित कॉफी शॉप चालकाने पालन न करता गर्दी जमवून कॉफी शॉप चालवीत होता. सोमवारी (दि.१७) दुपारी पावणेतीनच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत तांबडे, पोलीस नाईक सी. डी. मोरे, एन. ए. पवार गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या खबरीवरून त्यांनी गस्ती पथकाशी संपर्क साधून संबंधित कॉफी शॉप चालकावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गस्ती पथक सिक्रेट कॉफी शॉपमध्ये गेले असता तेथे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले.नियमापेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी, मास्क, सॅनिटायझरचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न राखणे यासारखे नियम न पाळता कॉफी शॉप सुरू असल्याने पोलिसांनी कॉफी शॉप चालक सतीश साजनसिंग बिसेन याच्याकडे चौकशी केली असता त्यानेदेखील मास्क न लावता पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत तांबडे यांच्या फिर्यादीवरून कॉफी शॉप चालक सतीश बिसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.