आचार्य आनंदऋषी यांची सिन्नरला जयंती उत्साहात

By Admin | Updated: August 1, 2014 01:06 IST2014-07-31T22:12:20+5:302014-08-01T01:06:32+5:30

आचार्य आनंदऋषी यांची सिन्नरला जयंती उत्साहात

Achievement of Sinnaral Jayanti by Acharya Anand Rishi | आचार्य आनंदऋषी यांची सिन्नरला जयंती उत्साहात

आचार्य आनंदऋषी यांची सिन्नरला जयंती उत्साहात

 

सिन्नर: जैन धर्माचे गुरु १००८ राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी यांची ११४ वी जयंती उत्साहात पार पडली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील जैन श्रावक संघाच्यावतीने सामुदायिक प्रार्थना व आचार्य आनंद ऋषी यांचे गुणगाण करण्यात आले. संघाचे अध्यक्ष मनोज भंडारी यांच्याहस्ते गुरुदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी युवक मंचचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती निमित्ताने दुपारी ‘लुक अ‍ॅण्ड लर्न’ या पाठशाळेच्यावतीने पाठशाळेतील मुलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आनंद गुरु यांच्या जीवन कार्यावरील वर्क्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात श्रृती खिवंसरा, साक्षी खिवंसरा, अक्षदा खिवंसरा, आर्या भंडारी यांनी यश मिळविले. त्यांना मन्यवरांच्याहस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर एक मिनिट स्पर्धा घेण्यात आली. त्यात एका मिनिटात जास्तीत जास्त ‘आनंद गुरु’ हा शब्द लिहिण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेत अनुक्रमे शुभम् शहा, रोशन खिवंसरा यांनी पहिला व दुसरा क्रमांक मिळविला. छोट्या गटातून मीन खिवंसरा, मिताली खवंसरा, साक्षी खिवंसरा, ऋती खिवंसरा यांनी गुरुंचे गुणगाण सादर केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोतीलाल खिवंसरा यांनी मुलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित करुन त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना
खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी सौ. मनिष काकंरिया, सौ. अर्चना खिवंसरा, सौ. दीपा शहा,
सौ. पूजा खिवंसरा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Achievement of Sinnaral Jayanti by Acharya Anand Rishi