बालिकेवर अत्याचाराचा आरोप; संशयितास चोप

By Admin | Updated: January 7, 2017 01:40 IST2017-01-07T01:39:43+5:302017-01-07T01:40:20+5:30

बालिकेवर अत्याचाराचा आरोप; संशयितास चोप

Accusations of atrocity against the child; Chop suspicious | बालिकेवर अत्याचाराचा आरोप; संशयितास चोप

बालिकेवर अत्याचाराचा आरोप; संशयितास चोप


नाशिकरोड : परिसरातील देवळाली गाव भागामध्ये एका चारवर्षीय बालिकेवर घराशेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याच्या आरोपावरून संतप्त रहिवाशांनी संशयिताला बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित प्रेमकुमार ऊर्फ पप्पू राजपूत याने परिसरात खेळत असलेल्या एका बालिकेस घरात बोलावून अत्याचाराचा प्रयत्न केला. बालिका रडत घरी परतल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला. त्यानंतर संतप्त रहिवाशांनी संशयितास चोप दिला. घटनास्थळी उपनगर पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणाव होता.

Web Title: Accusations of atrocity against the child; Chop suspicious