शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पारितोषिक रकमेचा दुरुपयोग

By admin | Updated: March 31, 2016 23:04 IST

शिरसगाव तंटामुक्त समिती : ग्रामसेवकाच्या चौकशीची मागणी

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील शिरसगावला मिळालेले प्रथम क्रमांकाचे तंटामुक्तीच्या रक्कमेची ग्रामसेवकाने परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप ग्रामस्थ व तंटामुक्ती समितीच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे गावातील विकासकामे झाली नसल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. शिरसगाव या ३१०० लोकवस्तीच्या गावात बहुतांश शेतकरी कुटुंब वस्तीवरच वास्तव्यास आहे. गावात मोलमुजरी करणारे तसेच आदिवासी कुटुंब मोठ्या संख्येने आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात काळ्या यादीत असलेल्या या गावाला सन २०१३-१४ साली तंटामुक्तीचे प्रथम पारितोषिक मिळाले. तंटामुक्तीच्या सदस्यांनी गावातील कुठलेही किरकोळ भांडण स्थानिक पातळीवरच मिटविण्यात येत असल्यामुळे गावाला ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.पी. वाघ यांच्या सहकार्याने चार लाखांचे बक्षीस मिळाले. २०१३मध्येच बक्षिसाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाली. मात्र ग्रामसेवक शिवाजी सुनबे यांनी सदरची रक्कम कुठे खर्च केली याची कोणालाच माहिती दिली नाही. सदर बक्षिसातून सुरू केलेल्या शौचालयाचे बांधकाम अर्धवट आहे. तंटामुक्तीच्या सदस्यांनी वेळोवेळी सदर शौचालय हे आदिवासी वस्तीत बांधावे म्हणून विनंती केली होती. मात्र ग्रामसेवकाने गावात प्रवेश करणाऱ्या ठिकाणीच शौचालय बांधले आहे. सुनबे यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचास बसावे लागत असून, गाव विकासकामांपासून वंचित राहिले आहे. सदर रकमेबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप तंटामुक्त सदस्यांनी केला आहे. सहा वर्षात भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांच्या सखोल चौकशीची मागणी २०१३ मधील तंटामुक्ती समितीचे सदस्य रंगनाथ मोरे, अण्णा मोरे, सुभाष मोरे, दिनकर आरगडे, सलीम पटेल, मनोहर भोसले, सुरेश बोंबले, भीमराव मोरे आदिंनी केली आहे. (वार्ताहर)