शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

७७५ कोटी रुपये एलबीटी वसूल

By admin | Updated: March 30, 2017 23:07 IST

नाशिक : चालू आर्थिक वर्षात महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून शासन अनुदानासह आतापर्यंत ७७५ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.

 नाशिक : चालू आर्थिक वर्षात महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून शासन अनुदानासह आतापर्यंत ७७५ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यात शासनाकडून एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारासह ३४२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. दरम्यान, महापालिकेने यावर्षी निश्चित केलेल्या ८१० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे.५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी शासनाने रद्द केला आहे. त्या मोबदल्यात महापालिकेला दरमहा शासन अनुदान तसेच एक टक्का मुद्रांक अधिभाराची रक्कम पाठविली जाते. महापालिकेला केवळ ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर एलबीटी वसूल करण्याचा अधिकार आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने ८१० कोटी रुपये एलबीटी वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मागील वर्षी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेने ७५१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट समोर ठेवले होते, परंतु उद्दिष्टापेक्षाही महापालिकेने जास्त म्हणजे ८३३ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त केले होते. यंदा महापालिकेने आतापर्यंत सुमारे ७७५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. त्यात महापालिकेला ५० कोटी रुपयांवरील उलाढालीतून मिळालेला एलबीटी ४३२ कोटी ९२ लाख रुपये इतका आहे. महापालिकेला शासनाकडून ठरविलेल्या उद्दिष्टानुसार दरमहा ३१.९१ कोटी रुपये अनुदान जमा होत असते. त्यानुसार महापालिकेला आतापर्यंत २९५ कोटी ६६ लाख रुपये एलबीटीपोटी मिळाले आहेत, तर एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची ४६ कोटी ६१ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.