शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण

By admin | Updated: March 30, 2017 23:10 IST

नाशिक : श्वान निर्बीजीकरणाच्या मोहिमेत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण झाले आहे

नाशिक : शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या श्वान निर्बीजीकरणाच्या मोहिमेत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण झाले आहे. दरम्यान, महापालिकेने पुढील आर्थिक वर्षासाठी नव्याने निविदा काढत नवीन ठेकेदार नेमला असून, त्यामार्फत मंगळवारी (दि.२८) श्वान निर्बीजीकरणाची मोहीम सुरू होणार आहे. महापालिकेने श्वान निर्बीजीकरणासाठी विल्होळी जकात नाका येथे केंद्र उभारले असून, त्याठिकाणी पकडून आणलेल्या श्वानांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी ठेकेदाराला प्रतिश्वान ७५० रुपये अदा केले जात होते. महापालिकेने सन २०१५ - १६ या वर्षाकरिता श्वान निर्बीजीकरणासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती. सन २०१५ मध्ये महापालिकेने ४३४६ श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यात नर श्वानांची संख्या १४९१, तर मादींची संख्या २८५५ इतकी होती. महापालिकेकडे श्वान पकडण्यासाठी दोन डॉग व्हॅन असून, १२ कर्मचाऱ्यांमार्फत सदर मोहीम राबविली जाते. सन २०१५ मध्ये महापालिकेने ३२ लाख ५९ हजार ५०० रुपये खर्च केले होते. महापालिकेने एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण केले आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून महापालिकेकडून नव्याने निविदाप्रक्रिया राबविली जात होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जुन्याच ठेकेदाराकडून काम सुरू होते. महापालिकेने अगोदर सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी एक कोटी १४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता, परंतु वाजवीपेक्षा जास्त रक्कम वाढविल्याने महासभेत त्याला विरोध झाला होता. अखेर आरोग्य विभागाने ९० लाख रुपयांचा ठेका देण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली. त्यात हैदराबाद येथील नवोदय सोसायटीला ठेका देण्यात आला असून, दोन डॉग व्हॅनमार्फत मंगळवार (दि.२८) पासून मोहीम सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.