शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:59 AM

नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यांमध्ये कमालिची वाढ झाली असून, आठवडाभरात पंधरा टक्के म्हणजेच धरणांमध्ये क्षमतेपेक्षा निम्मा जलसाठा झाला आहे, त्याच बरोबर पावसाची वार्षिक सरासरी देखील ६१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देपावसाची संततधार : सरासरी पोहोचली ६१ टक्क्यांवर; पिकांनाही जीवदान

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यांमध्ये कमालिची वाढ झाली असून, आठवडाभरात पंधरा टक्के म्हणजेच धरणांमध्ये क्षमतेपेक्षा निम्मा जलसाठा झाला आहे, त्याच बरोबर पावसाची वार्षिक सरासरी देखील ६१ टक्क्यांवर पोहोचली आहे. दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शेतीपिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरी वर्ग आनंदला आहे.जुन महिन्याच्या प्रारंभी जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने त्यानंतर थेट दिड महिना दडी मारली त्यामुळे पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. मका, सोयाबीन, भूईमूग, बाजरी या पिकांना पाण्याची गरज असतानाच पाऊस लांबल्यामुळे पिके धोक्यात आली, त्याच पावसाअभावी धरणांमध्येही जलसाठा होवू शकला नव्हता त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्तकेली होती. राज्यात अन्यत्र चांगला पाऊस होत असताना जिल्ह्णाकडेच पावसाने वक्रदृष्टी केल्याने चिंता व्यक्त केली.दुष्काळी तालुक्यांवर कृपापावसाच्या पुनरागमनामुळे आॅगष्ट महिन्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ४७ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या हा पाऊस ६१ टक्के इतका आहे. सर्वाधिक कमी पाऊस पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया पेठ व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यात अनुक्रमे ३६ व ३५ टक्के इतकाच झाला आहे. तर सुरगाणा तालुक्यातही ३७ टक्के पाऊस आहे. इगतपुरी तालुक्यात मात्र ७१ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया मालेगाव तालुक्यात यंदा १२४, बागलाणला १२१ आणि सिन्नरला १०८ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.इगतपुरी तालुक्यात १४५ मिमी पाऊसच्वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसात १४५ मिमी पाऊस झाला. दमदार पावसामुळे दोन दिवसात तालुक्यातील मोठ्या व लहान धरण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली, भाम व वैतरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. तालुक्यात एकूण २२०१ मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणातून नऊ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर भरलेली धरणातूनही ७०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भाम धरण ८३ टक्के, कडवा ५१, मुकणे ४६ तर वाकी धरण ३१ टक्के भरले आहे. वैतरणा धरणही ६० टक्के भरले आहे.नांदूरमधमेश्वर धरणातून १६८६५ क्यूसेक विसर्गनाशिक शहरात व धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी ९४६५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले तर दुपारपासून विसर्ग वाढवून सायंकाळी ६ वाजता १६,८६५ क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसWaterपाणी