शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाचे ४८ रिळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:31 IST

नाशिक : मानवी जीवितासह पक्ष्यांच्याही जीवितासाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठवणुकीवर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे. परिमंडळ-२ मधील सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक प्रमाणे पाच संशयितांविरुध्द नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.३१) गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकूण ४८ रिळ जप्त केले आहेत.

ठळक मुद्देपाच संशयितांविरुद्ध गुन्हे : चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई

नाशिक : मानवी जीवितासह पक्ष्यांच्याही जीवितासाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठवणुकीवर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे. परिमंडळ-२ मधील सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक प्रमाणे पाच संशयितांविरुध्द नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.३१) गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकूण ४८ रिळ जप्त केले आहेत.नायलॉन मांजाचा वापर आगामी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात पतंगबाजीसाठी वाढलेला दिसून येत आहे. यामुळे मुक्या पक्ष्यांसह नागरिकांना या मांजाचे ह्यघावह्ण सहन करावे लागत आहे. द्वारका येथे चार दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वार महिलेचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात चोरट्या मार्गाने होत असलेल्या नायलॉन मांजा विक्री व वापराचा प्रश्न चव्हाट्यावर आला. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-२मधील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक संशयित नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला आहे. नाशिकरोड भागात करण्यात आलेल्या कारवाईत एका मांजा विक्रेत्याच्या ताब्यातून तब्बल ३० रिळ जप्त केले गेले. इंदिरानगर, सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी चार रिळ पोलिसांनी जप्त केले. संबंधित संशयितांविरुध्द कलम-१८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा अथवा काचेचा मांजा वापरु नये तसेच पतंग, मांजा विक्रेत्यांनी आपल्या दुकानाबाहेर ठळकपणे ह्यनायलॉन मांजा बंदीह्णबाबत सूचना फलक लावून नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे टाळावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे खरात यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यPoliceपोलिस