३७ प्रशिक्षणार्थींची तुकडी रवाना

By Admin | Updated: September 6, 2016 22:25 IST2016-09-06T22:23:50+5:302016-09-06T22:25:44+5:30

उपक्रम : पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेची अंमलबजावणी

37 trainees leave the batch | ३७ प्रशिक्षणार्थींची तुकडी रवाना

३७ प्रशिक्षणार्थींची तुकडी रवाना

 मालेगाव : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या नाईक्स टिटोरियल्स नाशिक येथे बेडसाइड असिस्टन नर्स कोर्सच्या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील ३७ प्रशिक्षणार्थी मुलींची तुकडी रवाना झाली.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पंचायत समिती सभापती अ‍ॅड. यशवंत मानकर, गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे व सहाय्यक गटविकास अधिकारी किसन खातळे यांच्या प्रयत्नाने ही निवड झाली. सदरची तुकडी ही पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेणारी राज्यातील पहिली तुकडी ठरली आहे.
सदरचे प्रशिक्षण तीन महिन्यांचे निवासी असून, प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे. प्रशिक्षणार्थी मुलींना निरोप देण्यासाठी अ‍ॅड. मानकर, गटविकास अधिकारी पिंगळे व खताळे, जी. बी. राजबन्शी, गटसमन्वयक चंद्रकांत बोरसे, नीलेश मानकर, इस्माईल मुलानी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 37 trainees leave the batch