शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींचा गावगाडा होणार विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:13 IST

मानोरी : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करून किमान मासिक वेतन लागू करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी (दि. २२) पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देसंगणक परिचालकांचे उद्यापासून काम बंद आंदोलन

मानोरी : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करून किमान मासिक वेतन लागू करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी (दि. २२) पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

प्रलंबित मागण्यांचे निवेदन संगणक परिचालक संघटनेने ग्रामविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. आंदोलनात येवला तालुका संगणक परिचालक संघटनादेखील सहभागी होणार असल्याची माहिती येवला तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष सोपान सुराशे यांनी दिली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि संगणक परिचालक यांच्या बैठकीत ग्रामविकासमंत्र्यांनी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव घेतला असून त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मात्र मंत्र्यांनी निधी नसल्याचे कारण देत संगणक परिचालकांना मानधनवाढीचे आश्वासन दिले असता ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ ला शासन निर्णय काढत संगणक परिचालकांना केवळ १ हजार रुपये मानधनवाढ करत संगणक परिचालकाच्या जखमेवर मीठ चोळले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया संगणक परिचालकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे परिचालकांनी २२ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.अशा आहेत मागण्या1 ) आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून किमान मासिक वेतन लागू करणे.2 ) सुधारित आकृतिबंधानुसार सर्व परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान मासिक वेतन देण्याची तरतूद करणे.4 ) पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना १५ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती देऊन निधीची तरतूद करणे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार