शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२८४ धोकेदायक घरांना नोटिसा

By admin | Updated: July 20, 2016 00:34 IST

महापालिका : दुरुस्तीबाबत रहिवाशांचे मात्र दुर्लक्ष

नाशिक : गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील काही धोकेदायक वाडे-घरे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. महापालिकेने शहरातील सहाही विभागातील सुमारे २८४ धोकेदायक घरे-वाड्यांना नोटिसा बजावल्या असल्या तरी बव्हंशी रहिवाशांकडून दुरुस्तीबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नोटिसा केवळ उपचार ठरत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमार्फत धोकेदायक घरे-झोपड्या यांना नोटिसा बजावल्या जातात आणि धोकादायक भाग उतरुन घेण्याच्या सूचना केल्या जातात. यंदाही सहाही विभागमिळून सुमारे २८४ घरे-वाडे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात पूर्व विभागातील मोदकेश्वर आसराची वेसजवळील भोसलेवाडा तसेच बुऱ्हड गल्लीतील वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली, तर सोमवारी (दि.१८) पहाटे डिंगरआळीतील पोपडा वाड्याची भिंत कोसळली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पूर्व आणि पंचवटी विभागात सर्वाधिक जुने वाडे आहेत. या विभागातील धोकेदायक वाड्यांना दरवर्षी मनपामार्फत नोटिसा बजावल्या जातात, परंतु मालक-भाडेकरू वाद आणि न्यायप्रवीष्ट प्रकरणांमुळे रहिवाशांकडून दुरुस्तीबाबत गांभीर्याने घेतले जात नाही. पूर्व विभागातील काजीची गढी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. यंदाही पूर्व विभागाने काजीच्या गढीवरील ४९ धोकेदायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत, परंतु लोक घरे सोडायला तयार नाहीत. याशिवाय नदीकिनारी असलेल्या घरे व झोपड्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पंचवटी विभागाने वाघाडी नदीलगत असलेल्या बुरुड डोह तसेच काळाराम मंदिर पूर्व दरवाजाकडील गोरक्षनाथ मंदिरानजीक असलेल्या सुमारे ८२ धोकेदायक झोपड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात रविवार, दि. १० व ११ जुलै रोजी ११२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने धोकेदायक ठरलेल्या घरांच्या भिंती कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महापालिकेने आपत्कालीन स्थितीत निवारागृह उपलब्ध करून दिले असून, रहिवाशांनी धोकेदायक घरे उतरुन घ्यावीत अथवा दुरुस्त करावित, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)