शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा-सांडपाणी प्रकल्पासाठी २५ टक्के तरतुदीस मान्यता

By admin | Updated: February 12, 2015 00:48 IST

स्थायी समिती : अंदाजपत्रकात करावी लागणार तरतूद

नाशिक : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या एकूण भांडवली खर्चामधून २५ टक्के तरतूद नागरी घनकचरा व सांडपाणी प्रकल्पांसाठी करण्याला मनपा स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आगामी अंदाजपत्रकात सदर प्रकल्पांसाठी २५ टक्के तरतूद करण्यासाठी हिशेबाची जुळवाजुळव करताना आयुक्तांची कसोटी लागणार आहे. नदीप्रदूषणाबाबत नाशिक महापालिकेकडून पुरेशा उपाययोजना होत नसल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला होता आणि त्यासाठी नागरी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रियेसाठी एकूण भांडवली खर्चाच्या २५ टक्के तरतूद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदरचा प्रस्ताव २० जानेवारीला झालेल्या महासभेत ठेवण्यात आला असता महासभेने मंजुरी दिली होती. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही अधिक चर्चा न करता मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता प्रत्येक अंदाजपत्रकात महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रकल्पासाठी भांडवली खर्चाच्या २५ टक्के तरतूद करणे बंधनकारक बनले आहे. स्थायीच्या सभेत अनधिकृत होर्डिंगचाही विषय चर्चेला आला. प्रा. कुणाल वाघ यांनी शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होत नसल्याची तक्रार केली.यावर अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सर्वेक्षणानंतर अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आले असून, मनपाच्या रेकॉर्डवर ७२७ अधिकृत होर्डिंग्जची नोंद असल्याचे सांगितले. शीतल भामरे यांनी मागील सभेत जोपर्यंत प्रभागातील कामे होत नाही तोपर्यंत खुर्चीवर न बसण्याचा इशारा दिला होता. भामरे यांनी पुन्हा एकदा प्रभागातील ड्रेनेजच्या कामांचा प्रश्न उपस्थित केला असता सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दखल घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर भामरे या खुर्चीवर विराजमान झाल्या. (प्रतिनिधी)