२००० हजाराच्या नोटेलाही कुणी विचारेना

By Admin | Updated: November 14, 2016 02:00 IST2016-11-14T01:51:40+5:302016-11-14T02:00:50+5:30

२००० हजाराच्या नोटेलाही कुणी विचारेना

2000 thousand people who talk about niece | २००० हजाराच्या नोटेलाही कुणी विचारेना

२००० हजाराच्या नोटेलाही कुणी विचारेना

नाशिक : रांगेत उभे राहून दहा हजार मर्यादेपर्यंत रक्कम काढणाऱ्यांना बॅँकांकडून दोन हजाराच्या चार आणि शंभराच्या वीस याप्रमाणे नोटांचे वितरण करण्यात आले. मात्र दोन हजाराच्या नव्या नोटा मिळूनही ग्राहकांमागची वणवण काही संपलेली नाही. दोन हजाराची नोट सुटी करणे हे मोठे आव्हान ग्राहकांसमोर उभे ठाकले आहे.
महत्प्रयत्नांनंतर ग्राहकांच्या खिशात दोन हजाराच्या नोटा आल्या आहेत. नवीन नोट मिळाल्याचा आनंद ग्राहकांना मात्र फार काळ घेता आला नाही. बाजारात गेल्यानंतर दोन हजाराची नोट सुटी होणे कठीण झाले. शेपाचशेची खरेदी करून दुकानदाराला दोन हजाराची नोट देऊ केल्यानंतर दुकानदार दोन हजाराची नोट नाकारत आहे. परत देण्यासाठी शंभराच्या पुरेशा नोटा नसल्याचे कारण सांगत दोन हजाराची नोटही नाकारली जात आहे. त्यामुळे दोन हजाराची नोट किरकोळ खरेदीसाठी उपयुक्त ठरत नसल्याने आता ग्राहकांना पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षा आहे. काही विक्रेत्यांनी तर पैसे स्वीकारले मात्र उर्वरित सुटे पैसे नंतर देण्याची हमी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 2000 thousand people who talk about niece