रस्त्यावरील खड्डे चुकवताना बस उलटली, 20 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 01:29 PM2019-11-10T13:29:33+5:302019-11-10T13:31:11+5:30

खड्डे चुकवतांना चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेल्याने  हा अपघात झाला.  

20 passengers injured in Bus accident | रस्त्यावरील खड्डे चुकवताना बस उलटली, 20 प्रवासी जखमी

रस्त्यावरील खड्डे चुकवताना बस उलटली, 20 प्रवासी जखमी

googlenewsNext

नाशिक  : पुणे-अक्कलकुवा बसला मनमाडजवळच्या अनकवाडे शिवारात आज सकाळी अपघात झाला. इंदूर - पुणे महामार्गाची दुरावस्था झाली असून खड्डे चुकवतांना चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेल्याने  हा अपघात झाला.  यावेळी बसमध्ये  40 प्रवासी होते. त्यापैकी 18 ते 20 प्रवासी  किरकोळ  जखमी झाले. अपघात होताच प्रवाशांनी आरडाओरडा केल्यामुळे अनकवाड़े गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .प्रवाशांना किरकोळ झाली दुखापत..सुदैवाने जीवित हानी झाली नाही. नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यामुळे रोज अपघात होत आहेत.

Web Title: 20 passengers injured in Bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.