शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजीसह १३ जणांची माघार

By admin | Updated: February 7, 2017 00:51 IST

नाशिकरोडला १७ जणांची माघार

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी पंचवटी विभागातील विद्यमान नगरसेवकांसह दोघा माजी नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. माघारीच्या पहिल्याच दिवशी पंचवटीत एकूण १३ इच्छुकांनी माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून विद्यमान नगरसेवक रूपाली गावंड यांनी ‘ड’ गटात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचे पती हेमंत शेट्टी याच गटातून निवडणूक रिंगणात उतरले असल्याने गावंड यांनी अर्ज मागे घेतला, तर प्रभाग क्र मांक ५ मधून माजी नगरसेवक उल्हास धनवटे हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने त्यांच्या पत्नी माजी नगरसेवक जयश्री धनवटे यांनी ५ क गटातून अर्ज मागे घेतला आहे. (वार्ताहर)नाशिकरोडला  १७ जणांची माघारनाशिकरोड : मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशी नाशिकरोडच्या सहा प्रभागातून एकूण १७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. नाशिकरोड विभागातील ६ प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर एकूण २९१ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज राहिले होते. माघारीच्या सोमवारी पहिल्या दिवशी प्रभाग १७ अ - शरद विक्रम गांगुर्डे, १८ अ- बाबासाहेब विश्वनाथ अस्वले, विशाल चंद्रकांत पवार, खिलेंद्रकुमार दिलीप मोहबिया, गौतम बन्सी पगारे, जितेंद्र बाळु बराते, क- मुक्ता बाळासाहेब पोरजे, ड- विशाल रवींद्र चावरिया, प्रभाग १९ अ- संदीप लक्ष्मण पवार, मनिषा सुनील कांबळे, क- भारती अंबादास ताजनपुरे, राहुल अंबादास ताजनपुरे, प्रभाग २० अ- अमोल दिनकर पगारे, कोमल प्रताप मेहरोलिया, प्रभाग २१ ब- सुधाकर निवृत्ती जाधव, ड- मसुद जिलानी शेख, राजेंद्र शंकर मंडलिक या १७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)सातपूर प्रभागातून १२ अर्ज माघारसातपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी चार प्रभागातून १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विद्यमान नगरसेवक लता पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. तर विद्यमान स्थायी सभापती सलीम शेख यांनी प्रभाग क्र . १० मधून माघार घेतली असून, ते प्रभाग क्र . ११ मधून लढत आहेत. महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीनंतर १४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक ८ मधून गजेंद्र गुंजाळ (सर्वसाधारण), शिवाजी पवार, जयराम पवार, भिवानंद काळे, भगवान तालखे (अनुसूचित जाती), प्रभाग क्र मांक ९ मधून जनाबाई इघे (सर्व सधारण महिला), विद्यमान नगरसेवक लता पाटील (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र मांक १० मधून विद्यमान नगरसेवक सलीम शेख, किशोर निकम (सर्वसाधारण), प्रभाग क्र मांक ११ मधून तुळसाबाई काळे (अनुसूचित जाती महिला), नीलेश भंदुरे (ओबीसी), मीरा धात्रक (सर्वसाधारण) आदि १२ उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. माघारीनंतर १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दि. ८ रोजी माघारीचा शेवटचा दिवस आहे. खरे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)