जमिनींच्या बाजारमूल्यात दहा टक्के वाढ

By Admin | Updated: April 2, 2017 01:56 IST2017-04-02T01:56:19+5:302017-04-02T01:56:37+5:30

नाशिक : जमिनीबरोबरच सदनिका व वाणिज्य वापर केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्यांकन ठरविणारे चालू वर्षाचे बाजारमूल्य (रेडीरेकनर) जाहीर करण्यात आले

10% increase in market value of land | जमिनींच्या बाजारमूल्यात दहा टक्के वाढ

जमिनींच्या बाजारमूल्यात दहा टक्के वाढ

 नाशिक : जमिनीबरोबरच सदनिका व वाणिज्य वापर केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्यांकन ठरविणारे चालू वर्षाचे बाजारमूल्य (रेडीरेकनर) जाहीर करण्यात आले असून, नाशिक शहरात जमिनींच्या दरात साधारणत: आठ ते दहा टक्के दरवाढ सुचविण्यात आली असून, वाणिज्य वापराच्या जागा महागल्या आहेत. फारशी वाढ नसलेल्या बाजारमूल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुस्तावलेला जमिनीचा बाजार उठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी सव्वा वर्ष लांबणीवर पडलेले बाजारमूल्य यंदा १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले असून, शनिवारपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन रेडीरेकनरनुसार यापुढे जमिनींच्या व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी सहा खंड प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात खुली जमीन, निवासी सदनिका, वरच्या मजल्यावरील कार्यालय, व्यावसायिक वापर, तळमजल्यावरील दुकाने अशा विविध वर्गांसाठी रेडीरेकनर निश्चित करण्यात आले आहे. साधारणत: काही भागात जमिनींच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही, मात्र व्यावसायिक वापरासाठी दर आकारणी गेल्या वर्षापेक्षा अधिक आहे, तर काही ठिकाणी मात्र जमिनींच्याही दरात वाढ दर्शविण्यात आलेली आहे. नवीन रेडीरेकनरच्या दराचा विचार करता, नोटाबंंदीमुळे एकूणच सर्व क्षेत्रात आलेली मंदी पाहता, त्याचा विचार बांधकाम क्षेत्रासाठी करण्यात आला असून, बांधकाम क्षेत्राला नवीन रेडीरेकनरच्या दृष्टीने चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातच गावठाण व गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मिळकतींसाठी अल्पशी वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 10% increase in market value of land