जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तके वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:22 IST2020-06-21T12:22:23+5:302020-06-21T12:22:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता ...

Z.P. Distribute books to school students from door to door | जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तके वाटप

जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तके वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता त्यांच्या घरी जाऊन शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करीत आहेत.
प्रकाशा येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना घरीच राहून काळजी घ्या व अभ्यास करा, नियमित हात स्वछ धुवा, अशा सूचनाही शिक्षक देत आहेत. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेत पुस्तक आली आहेत. विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही मात्र विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहू नये यासाठी प्रकाशा येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, जि.प. कन्या शाळा, जिल्हा परिषद शाळा रामनगर, शामनगर या सर्व शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तक वाटप सुरू केले आहेत. जि.प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुसंख्य पालक मजूर व कामगार आहेत. त्यातील बºयाच जणांकडे अँड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी पहिल्या दिवसापासूनच घरोघरी जाऊन पुस्तक वाटप सुरू केले आहे. पालकांनीही शिक्षकांच्या या उपक्रमामुळे समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Z.P. Distribute books to school students from door to door