प्रकाशा येथील जि.प. कन्या शाळेत अवतरली रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:30 PM2020-02-16T13:30:19+5:302020-02-16T13:30:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून शिक्षण विभागातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रकाशा ...

Zip at Prakash The girl got on the train | प्रकाशा येथील जि.प. कन्या शाळेत अवतरली रेल्वे

प्रकाशा येथील जि.प. कन्या शाळेत अवतरली रेल्वे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून शिक्षण विभागातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रकाशा येथील जि.प. कन्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कल्पकतेने वर्गखोल्यांना रंगकाम करून रेल्वे डब्यांचा लूक देण्यात आला आहे.
या वर्गखोल्यांचे उद्घाटन जि.प. सदस्या भारतीबाई भिल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील, पं.स. सदस्य रंगा भील, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी उषा पेंढारकर, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील उपस्थित होते. या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. त्यात बेटी बचाव बेटी पढाओ, वनभोजन, दप्तरविना शाळा उपक्रम, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन, विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती, शालेय क्रीडा स्पर्धा याद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षक भाऊराव कोकणी, प्रियंका पाटील, नूतन पाटील, अनुराधा गव्हाणे हे परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, माजी सरपंच भावडू ठाकरे, ग्रा.पं. सदस्य अरुण भील, भटू सामुद्रे, कृषी विस्तार अधिकारी जी.पी. कुलकर्णी, संतोष सोनार, पंडित धनराळे, पिरामल फाऊंडेशनचे तालुका समन्वयक रमेश जायनाकर, वैजालीचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, प्रकाशा येथील जि.प. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Zip at Prakash The girl got on the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.