जिल्हा परिषद पदाधिकारी निवासस्थानांची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST2021-02-18T04:59:40+5:302021-02-18T04:59:40+5:30

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचा पाच ते सात दिवसांपासून वीजपुरवठा कट करण्यात आला आहे. त्याचा त्रास पदाधिकाऱ्यांना ...

Zilla Parishad office bearers' residence lights go out | जिल्हा परिषद पदाधिकारी निवासस्थानांची बत्ती गूल

जिल्हा परिषद पदाधिकारी निवासस्थानांची बत्ती गूल

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचा पाच ते सात दिवसांपासून वीजपुरवठा कट करण्यात आला आहे. त्याचा त्रास पदाधिकाऱ्यांना सहन करावा लागत असल्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे सदस्य सी.के. पाडवी यांनी स्थायी समितीच्या सभेत केली. संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा बुधवारी अध्यक्षा सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती अभिजित पाटील, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती जयश्री पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ तर सदस्य धनराज पाटील, विजय पराडके, सी.के.पाडवी, देवमन पवार उपस्थित होते. यावेळी सी. के. पाडवी यांनी सभागृहात सांगितले की, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींचे निवासस्थान बांधले आहेत. मात्र या निवासस्थानातील वीजपुरवठा वीज बिल न भरल्याने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कट करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळेस सभागृहात संबंधित कर्मचाऱ्यास बोलविण्यात आले. त्यांनी सांगितले की, वीज बिल हे एक वर्षाचे भरले जाते. मागील बिल फेब्रुवारी २०२० मध्ये भरले होते व यावर्षी फेब्रुवारीचे बिल भरणार होतो. मात्र वीज कंपनीने एप्रिल २० पासून पुढे ज्यांचे वीज बिल बाकी आहे त्यांचे कनेक्शन कट केले असल्याचे सांगितले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी एक वर्षात बिल भरण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत या थकीत बिलापोटी व्याज भरावे लागत असल्याचे सांगून दर महिन्याला ऑनलाइन बिल भरावे, असे सांगितले.

देवमन पवार यांनी अंगणवाडीतील स्थलांतरित बालकांचा संबंधात महिला व बालकल्याण विभागाने दिलेली माहिती चुकीचे असल्याचे सांगून ठाणेपाडा येथील अंगणवाडी क्रमांक पाचमधील २१ बालके स्थलांतरित झाली असून त्याचा आहार कोणाला देण्यात येतो याची चौकशी करावी, अशी मागणी केली. अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची बदली केल्याने रिक्त पदावर कोणाचीही नियुक्ती न केल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले. यावर राठोड यांनी सांगितले की ९५ पदांपैकी एकूण ६९ पदांवर पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. आहाराबाबत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.

धडगाव तालुक्यात अंगणवाडीतील सेविका यांची निवड स्थानिक स्तरावरील उमेदवारांना मधूनच करण्यात यावी, अशी मागणी विजय पराडके यांनी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना तशा सूचना दिल्या असून शासन निर्णयानुसार पदभरती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

n जिल्ह्यात सामाजिक दायित्व योजनेतून रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. मात्र शववाहिका नसल्याचा सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला. यावर अध्यक्षा सीमा वळवी यांनी प्रत्येक तालुक्याला एक शववाहिका मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

n३१९ जुन्या शाळांच्या इमारती निर्लेखित करण्यात आल्या असून त्या पाडण्याचे काम सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.राहुल चौधरी यांनी सांगितले.

nधनराज पाटील यांनी निरंतर शिक्षणाधिकारी सभेत येत नसल्याचे सांगून त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांना पगार कोण देतो किंवा किती कर्मचारी आहे याबाबत त्यांना पुढील सभेस बोलवावे अशी मागणी केली.

nजिल्हा परिषद आवारात जुने साहित्य, भंगार, तसेच जुन्या गाड्यांची विक्री, व पाईप हे भंगारात पडल्याचे सांगितले यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्च अखेर ही विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सुचना केल्या.

Web Title: Zilla Parishad office bearers' residence lights go out