अनैतिक संबंधाच्या वादातून युवकाचा खून

By Admin | Updated: May 31, 2017 17:18 IST2017-05-31T17:18:28+5:302017-05-31T17:18:28+5:30

याप्रकरणी चिंचोदा, ता.निझर येथील एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youth's murder through immoral relations | अनैतिक संबंधाच्या वादातून युवकाचा खून

अनैतिक संबंधाच्या वादातून युवकाचा खून

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 31 - प}ीशी असलेल्या अनैतिक संबधाच्या वादातून युवकाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना होळ, ता.नंदुरबार शिवारात घडली. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी चिंचोदा, ता.निझर येथील एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत तुकाराम कोतवाल (22) रा.होळतर्फे हवेली, ता.नंदुरबार असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी महारू इंदास ठाकरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, चिंचोदा, ता.निझर येथील महारू इंदास ठाकरे याचे दुसरे लगA झाले होते. त्याच्या दुस:या प}ीचे होळतर्फे हवेली येथे राहणा:या भरत तुकाराम कोतवाल (22) याच्याशी अनैतिक संबध असल्याचा संशय महारू ठाकरे यास होता.  भरत कोतवाल हा 26 मे रोजी रात्री आला असता त्याला महारू ठाकरे याने लोखंडी टॉमीने तोंडावर, कानावर जबर मारहाण केली.  त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह लगतच्याच विहिरीत टाकून दिला. 27 रोजी भरत कोतवाल याचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलीस तपासात कोतवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस जमादार सुभाष ठाकरे यांनी फिर्याद दिल्याने महारू इंदास ठाकरे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   

Web Title: Youth's murder through immoral relations