शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा नदीपात्रात युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

सविस्तर वृत्त असे की, शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळील लक्ष्मीनगरात राहणारा व पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करणारा पंकज प्रकाश तामसे ...

सविस्तर वृत्त असे की, शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळील लक्ष्मीनगरात राहणारा व पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करणारा पंकज प्रकाश तामसे (भोई) (२८) हा युवक २० जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घरी कोणाला काही न सांगता संताप व नैराश्यात निघून गेला होता. त्याची दुचाकी सारंगखेडा येथील पुलावर आढळून आली. त्याने नदीपात्रात उडी घेतली असावी, असा संशय २० जानेवारी रोजी व्यक्त करण्यात आला होता. त्या अनुषंगाने टाकरखेडा येथील मच्छिमार व भोई समाजाच्या तरुणांनी त्याचा दिवसभर शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. याबाबत मयत पंकज तामसेच्या नातेवाईकांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. सारंगखेड्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनीही सहकाऱ्यांसोबत शोधमोहिमेत सहभाग घेतला.

शुक्रवारी सकाळी पंकजचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजताच शोककळा पसरली. पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक कोळी, रमेश पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, विजय गावीत आदींनी सारंगखेडा व टाकरखेडा येथील मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वडाळीचे डॉ. राजन दुग्गड यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यांना डॉ. कांतीलाल पावरा यांनी सहकार्य केले. मयत पंकजच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. शहादा येथे दुपारी तीन वाजता त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.