मोकसमाळ येथे दोघांकडून युवतीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:34 IST2019-10-03T11:34:46+5:302019-10-03T11:34:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोकसमाळ ता़ तळोदा येथे युवतीचा विनयभंग करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणा:या तिघांविरोधात गुन्हा ...

Young woman molested at Moksaml | मोकसमाळ येथे दोघांकडून युवतीचा विनयभंग

मोकसमाळ येथे दोघांकडून युवतीचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोकसमाळ ता़ तळोदा येथे युवतीचा विनयभंग करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणा:या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 24 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती़ 
मोकसमाळ येथील पिडित युवती बहिण आणि वहिनीसोबत राणीपूर ता़ तळोदा येथून लाकडाच्या मोळ्या विक्री करुन पायीच घराकडे जात होती़ दरम्यान विक्रम सत्या पाडवी, किशन राज्या वसावे या दोघांनीही त्यांचा पाठलाग करुन मोकसमाळ शिवारात युवतीला थांबवत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ युवतीने नकार दिल्यानंतर तिला ठार मारण्याची धमकी दिली होती़ ही माहिती युवतीने वडीलांना दिल्यानंतर त्यांनी गाव पंचात माहिती दिली होती़ याबाबत युवतीने सोमवारी सायंकाळी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन विक्रम पाडवी व किशन वसावे या दोघांविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करत आहेत़ 
 

Web Title: Young woman molested at Moksaml