मोदी लाटेमुळेच तुम्ही निवडून आलात-रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST2021-05-06T04:32:55+5:302021-05-06T04:32:55+5:30

नंदुरबार : खासदार डॅा.हिना गावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्याईने निवडून आलेल्या आहेत. परंतु त्यांचे उपकार विसरून त्या ...

You were elected because of the Modi wave - Raghuvanshi | मोदी लाटेमुळेच तुम्ही निवडून आलात-रघुवंशी

मोदी लाटेमुळेच तुम्ही निवडून आलात-रघुवंशी

नंदुरबार : खासदार डॅा.हिना गावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्याईने निवडून आलेल्या आहेत. परंतु त्यांचे उपकार विसरून त्या गावीत घराण्याच्या पुण्याईचे स्तोम वाजवीत आहेत ही बाब निषेधार्ह असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे. फेसबूक लाईव्हवर त्यांनी खासदारांच्या आरोपांना उत्तरे दिली.

पत्रकार परिषदेत खासदार गावीत यांनी रघुवंशी यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देतांना त्यांनी सांगितले. खासदार डॅा.हिना गावीत यांनी आपण टॅापटेन खासदार तसेच सहा वेळा निवडून आलेल्या आमदाराला आपल्या बळावर, आपल्या वडिलांच्या विकास कामाच्या बळावर हरविल्याचे म्हटले आहे, परंतु ज्यांच्यामुळे निवडून आल्या त्या पंतप्रधान मोदी यांचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही ही बाब निषेधार्ह आहे.

भाजपच्या ११ नगरसेवकांना अपात्रतेसाठी याचिका दाखल आहे. तर भाजपनेही नगराध्यक्षांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर त्यांनी सांगितले, अपात्रतेची मागणी काय करता त्यांचा राजीनामा मागा, मी सांगितल्यावर त्या राजीनामा देतील, परंतु भाजपचे ११ नगरसेकही राजीनामा देतील का? ते तुमचे ऐकतील की चौधरी बंधूचे? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: You were elected because of the Modi wave - Raghuvanshi