शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

३०० वर्षांची परंपरा असलेले काथर्दे व मंदाणे येथील यात्रोत्सव यंदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

मंदाणे येथील शाकंभरी मातेच्या यात्रोत्सवाला सुमारे ३७० वर्षांची परंपरा आहे. सोबतच काथर्दे येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवालाही ३०० वर्षांची परंपरा ...

मंदाणे येथील शाकंभरी मातेच्या यात्रोत्सवाला सुमारे ३७० वर्षांची परंपरा आहे. सोबतच काथर्दे येथील खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवालाही ३०० वर्षांची परंपरा आहे. शहादा तालुक्यात सारंगखेडा यात्रोत्सवानंतर या दोन्ही यात्रोत्सवांची प्रतीक्षा असते. मंदाणे येथे दरवर्षी शुद्ध शाकंभरी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होते. दोन्ही ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. यंदा २८ जानेवारीपासून दोन्ही यात्रा सुरु होणार होत्या. परंतु, कोरोना संसर्गाचा धोका असल्याने प्रशासनाच्या आदेशानंतर ग्रामपंचायतींच्या निर्णयाने यात्रोत्सव रद्द करण्यात आला. यात्रा रद्द झाल्याने अनेकांना रोजगारांवर पाणी सोडावे लागणार आहे. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. शहादा शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती लक्षात घेता मंदाणे व काथर्दे गावातील यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासन व ग्रामपंचायतींकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मोठी परंपरा लक्षात घेता २८ जानेवारी रोजी या दोन्ही गावांतील मंदिरात जन्मोत्सवानिमित्त कोविड नियमांच्या अधीन राहून विधीवत पूजन करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. यात्रोत्सव रद्द झाला असल्याने केवळ पूजन साहित्य विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. इतर व्यावसायिकांनी दुकाने लावू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

मंदाणे यात्रेसंबंधी झालेल्या बैठकीत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. झेड. देवरे, सरपंच विजय सनेर, उपसरपंच अनिल भामरे, सामाजिक कार्यकर्ते शरद साळुंखे, दिनेश पवार, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाटील, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी पी. यू. धनगर, रवींद्र पाटील, प्रवीण भील उपस्थित होते.

काथर्दे येथील नागरिक, ट्रस्टच्या वतीने आणि ग्रामपंचायतीकडून यात्रा रद्दचा निर्णय घेण्यात आला. यावेळी काथर्दे येथील ग्रामसेवक एस. आर. सरदार, सरपंच गोरख भील, उपसरपंच गुलझारसिंग गिरासे, पोलीस पाटील कोमलसिंग गिरासे, ट्रस्ट अध्यक्ष गुलाबसिंग गिरासे, उपाध्यक्ष लिंबा गिरासे, ट्रस्टचे चेअरमन भीमसिंह गिरासे, केसरसिंग गिरासे उपस्थित होते.