शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जयनगर येथील अंगारकी चतुर्थीला होणारा यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

शहादा तालुक्यातील जयनगर येथे श्री हेरंब गणेशाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. अंगारकी चतुर्थीला खानदेशसह गुजरात व मध्य प्रदेशातून हजारो भाविक ...

शहादा तालुक्यातील जयनगर येथे श्री हेरंब गणेशाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. अंगारकी चतुर्थीला खानदेशसह गुजरात व मध्य प्रदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. येथील श्री हेरंब गणेशाचे मंदिर हेमाडपंती असून अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे. त्यामुळे भाविकांमध्ये या देवस्थानाबद्दल अपार श्रद्धा आहे. वर्षातून एक अथवा दोन मंगळवारी अंगारकी चतुर्थीचा योग येतो. मागील वर्षी कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद होती. योगायोगाने मागील वर्षी एकही अंगारकी चतुर्थीचा योग आला नाही. दीड वर्षानंतर आता अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. मात्र, यात्रा रद्द केल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. हेरंब गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी व विश्वस्त मंडळाकडून मंगळवारी अंगारकी चतुर्थीला दर्शनाला व नवस फेडायला भाविकांनी यात्रोत्सव रद्द झाल्याने येऊ नये, असे आवाहन केले आहे.

व्यावसायिकांना फटका

अंगारकी चतुर्थीला जयनगर येथे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. हजारो भाविकांसोबत अनेक दुकानदार नारळ, पूजेचे साहित्य, खेळणी, रसवंतीगृह, उपाहारगृहे आदी दुकाने लावतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त भरणारी यात्रा सारंगखेडा पोलीस स्टेशनने रद्द करण्याचे आदेश दिल्याने दुकानदारांनी आपली दुकाने लावू नयेत, असे मंदिर ट्रस्टकडून आवाहन करण्यात आले आहे. यामुळे दुकानदारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.