अक्कलकुवा येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरणांतर्गत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST2021-03-13T04:56:35+5:302021-03-13T04:56:35+5:30

या अभियानाद्वारे ग्रामपंचायतस्तरावर कार्यक्रम घेऊन समान हक्क व समान वागणूक, घरकुलामध्ये पती-पत्नी या दोघांची नावे असावी, तंबाखूमुक्त अभियान, दारुमुक्त ...

Workshop on Mahasamrudhi Women Empowerment at Akkalkuwa | अक्कलकुवा येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरणांतर्गत कार्यशाळा

अक्कलकुवा येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरणांतर्गत कार्यशाळा

या अभियानाद्वारे ग्रामपंचायतस्तरावर कार्यक्रम घेऊन समान हक्क व समान वागणूक, घरकुलामध्ये पती-पत्नी या दोघांची नावे असावी, तंबाखूमुक्त अभियान, दारुमुक्त अभियान, कायदेविषयक जनजागृती, महिलांच्या सक्षम समूहांना फिरता निधी, जाेखीम प्रवणता निधी, बँक कर्ज, एनआरईटीपी निधी, बाजार जोडणी, महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्री व्हावी यासाठी मॉलची उपलब्धता, विक्री केंद्र, ऑनलाईन विक्री केंद्र आदी बाबींवर भर देण्यात येणार असल्याची माहिती किशोर पवार यांनी दिली. मीनाक्षी वळवी यांनी विविध योजनांची माहिती दिली.

उपसभापती पाडवी यांनी महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी तयार केलेल्या संस्था भक्कम कराव्या, आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडावेत, या अभियानामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे. उमेदमुळे ग्रामीण भागातील महिला सक्षम झाल्या आहेत. विविध योजनांचा लाभ झाल्याने महिलांचा सर्वांगिण विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक संभाजी पावरा यांनी तर आभार पिंकी वळवी यांनी मानले, प्रसंगी तालुका अभियान कक्षाचे अरविंद बागले, निखील शिर्केे, तुषार वळवी, राकेश वसावे, योगेश जाधव, राजेश राठोड, बलराम झांजरे, योगेश्वरी ठाकूर यांच्यासह अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी, पिपंळखुटा, खापर, रायसिंगपूर, गंगापूर, मोरंबा, भांग्रापणी, मोलग व वेली येथील महिला उपस्थित होत्या.

Web Title: Workshop on Mahasamrudhi Women Empowerment at Akkalkuwa