शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व पोषण विषयावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST

यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड ,महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे कार्यक्रम अधिकारी नीलेश गंगावणे, कुपोषणमुक्त नंदुरबार अभियानाच्या ...

यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड ,महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे कार्यक्रम अधिकारी नीलेश गंगावणे, कुपोषणमुक्त नंदुरबार अभियानाच्या प्रमुख डॉ. नवनीता रुद्रा आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. हीना गावीत म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागातील बालक आणि महिलांच्या आरोग्य व पोषणसंबंधी सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ मध्ये न्युट्रिशन इंडिया कार्यक्रम हा पथदर्शी प्रकल्प नंदुरबार व अमरावती जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील १०० गावांमध्ये २२ समुदाय पोषण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे.

लहान मुलांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे, गर्भवती महिलांना संस्थागत प्रसूती व इतर आरोग्य सुविधांचा लाभ देणे, आदिवासी महिलांमध्ये पोषण, आरोग्य सेवा आणि सवयीबद्दल जनजागृती करून कुपोषण व आरोग्य निर्देशांकात सुधारणा घडवून आणणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. नंदुरबार जिल्ह्यात झालेले कुपोषणमुक्तीचे काम देशभरात चांगले असल्याचे सर्वेक्षणाच्या अहवालावरून स्पष्ट होते. याचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांना आहे, असे त्यांनी सांगितले.

जनजागृतीसाठी दिल्ली येथून १६०० किलोमीटरचे अंतर पार करून आलेल्या सात बाईक राईडर महिलाचे डॉ.भारुड यांनी कौतुक केले. ते म्हणाले, दुर्गम भागातील कर्मचारी गर्भवती मातांचे प्रबोधन आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी चांगले प्रयत्न करीत आहेत. येणाऱ्या वर्षात अधिक कुपोषणमुक्तीच्या क्षेत्रात अधिक चांगले होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांचे आणि कामांचे विश्लेषण करून त्यात गरजेनुसार आवश्यक बदल करावा, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी खासदार गावीत यांच्या हस्ते समुदाय पोषण कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.