शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पेरणीसाठी कामे आटोपली, आता मृगाच्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

वडाळी महसूल मंडळात बामखेडा, तोरखेडा, वडाळी, हिंगणी, फेस, दोंडवाडे, काकर्दा, कोंढावळ, जयनगर, मातकूट, बोराळा, खैरवे, भडगाव आदी २० ...

वडाळी महसूल मंडळात बामखेडा, तोरखेडा, वडाळी, हिंगणी, फेस, दोंडवाडे, काकर्दा, कोंढावळ, जयनगर, मातकूट, बोराळा, खैरवे, भडगाव आदी २० ते २५ गावांचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची तयारी पूर्ण झाली आहे. मागील खरीप हंगामात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. पण यंदा कापसाचे क्षेत्र घटणार आहे, असे शेतकरी व कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. ऊस, पपई, केळी व कांदा या पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यामध्ये एकूण पेरणी क्षेत्राच्या कापूस लागवडीबरोबरच बाजरी, ज्वारी, मूग, तूर, भुईमूग, तीळ, उडीद, मका अशी लागवडीखालील कमी पाणी लागणारी पिकेही राहू शकतात, असा अंदाज कृषी विभागाने दिली आहे.

कृषी विभागातर्फे योजनांची माहिती

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना गावोगावी प्रत्यक्ष शेतावर, गाव चावडीवर बीज प्रक्रिया, विकेल ते पिकेल, एक गाव एक वाण, जमीन सुपिकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर, घरगुती बियाणे, उगवण क्षमता तपासणी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महाडीबीटी योजना, तसेच बांधावर खत, बियाणे वाटप, अनुदानावर सुधारित, संकरित बियाणे वितरणाबाबत कृषी विभागामार्फत माहिती दिली जात आहे. मंडळातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

खरीप हंगामाची पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी पेरणी करतो. यामध्ये शेतकऱ्यांनी आता जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, खते यांची निवड करून कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार घ्यावी. घेतलेले बियाणे उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करावी व पुरेशी ओल म्हणजे ७५ ते १०० मिमी चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी.

- किशोर हडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा