महिला लोकशाही दिनाच्या ॲानलाईन तक्रारीच स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:28+5:302021-03-14T04:27:28+5:30

नंदुरबार : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध ...

Women will only accept online complaints on Democracy Day | महिला लोकशाही दिनाच्या ॲानलाईन तक्रारीच स्वीकारणार

महिला लोकशाही दिनाच्या ॲानलाईन तक्रारीच स्वीकारणार

नंदुरबार : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणारा मार्च महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणार नाही. महिला लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता, आपले तक्रार अर्ज ई-मेलवर किंवा ९४२०३७२०६७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर १५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत पाठवावेत. महिला तक्रारदारांनी प्रत्यक्षात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. महिला लोकशाही दिनात तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्याप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक व आस्थापनाविषयक विषयांचे अर्ज महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

Web Title: Women will only accept online complaints on Democracy Day