शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी सक्षम होऊन गाव, जिल्ह्याचा विकास करावा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनारचे आयोजन ...

येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनार मालिकेचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन संस्था महाराष्ट्र राज्य, पुणेचे उपसंचालक विकास गरड यांच्या हस्ते करण्यात आले. शबरी मातेच्या जीवनातील श्रीरामभेटीचा प्रसंग वर्णन करून महिला सक्षमीकरणाचे महत्व विशद करतानाच महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधत शिक्षण विभागाने आयोजित केलेला विशेष ऑनलाइन लाइव्ह वेबिनार उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार डॉ. राजेंद्र भारूड यांनी यावेळी बोलताना काढले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, डायटचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम गटशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास व दिशा याविषयी अनुभव कथन करताना सांगितले की, महिलांनी स्वतः निर्णय घेणे व त्या निर्णयावर ठाम असणे आवश्यक आहे. स्वतःच्या परिश्रमातून ओळख कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न होणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शहादा येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता जैन म्हणाल्या की, महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्ष राहाणे आवश्यक असून, आरोग्य म्हणजे काय, हे सांगत आरोग्याची व्याख्या स्पष्ट करून प्रकृतीनुसार आहार घ्यावा. ॲड. सीमा खत्री यांनी महिलांना संरक्षणाबाबत नियम व कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, कामाच्या ठिकाणीदेखील महिलांसाठी कायदे असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या अधिव्याख्यात्या डॉ. वनमाला पवार यांनी केले. मीनाक्षी गिरी यांनी प्रास्ताविक केले. या वेबिनारला जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, रमेश चौधरी, अधिव्याख्याता बी. आर. पाटील, पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे तसेच विषय सहायक प्रकाश भामरे, संदीप पाटील, देवेंद्र बोरसे, उदय केदार, अलका पाटील यांनी परिश्रम घेतले. सोनल शिंदे यांनी आभार मानले.