सासूकडे चुगली केली म्हणून महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:43 IST2019-10-09T12:43:26+5:302019-10-09T12:43:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सासूकडे चुगली केल्याच्या संशयावरुन फत्तेपूर ता़ शहादा येथे महिलेस सहा जणांनी बेदम मारहाण केली़ ...

The woman was beaten as she stumbled upon her mother-in-law | सासूकडे चुगली केली म्हणून महिलेस मारहाण

सासूकडे चुगली केली म्हणून महिलेस मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सासूकडे चुगली केल्याच्या संशयावरुन फत्तेपूर ता़ शहादा येथे महिलेस सहा जणांनी बेदम मारहाण केली़ रविवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली़ 
सुरेखा महेंद्र पानपाटील रा़ फत्तेपूर असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव आह़े रविवारी सायंकाळी त्यांच्यासोबत भूरीबाई विशाल पानपाटील यांनी सासूकडे चुगली लावली या कारणातून वाद घातला होता़ दरम्यान सुरेखाबाई यांना भुरीबाई यांच्यासह लताबाई पंढरीनाथ भामरे, पंढरीनाथ भामरे, गोरख पंढरीनाथ भामरे, नंदीनी भामरे, दादा तुळशीराम पानपाटील सर्व रा़ होळमोहिदे ता़ शहादा यांनी बेदम मारहाण केली़ 
याप्रकरणी सुरेखाबाई यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास    पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरे करत आहेत़ 
 

Web Title: The woman was beaten as she stumbled upon her mother-in-law