लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव रिक्षाला चालकाने अचानक ब्रेक लावल्याने रिक्षा उलटून महिला जागीच ठार झाल्याची घटना वाघाळे, ता.नंदुरबारनजीक घडली. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुलीबाई सामा गावीत (५८) रा.आमरसपाडा, ता.नंदुरबार असे मयत महिलेेचे नाव आहे. राजेंद्र कोकणी हा आपल्या ताब्यातील रिक्षा (क्रमांक एमएच ३९-सी ८०८३) भरधाव नेत असतांना अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. त्यात धुलीबाई यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सामा सोमा गावीत यांनी फिर्याद दिल्यने चालक राजेंद्र कोकणी यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}