उंदराच्या धक्क्याने पेटता दिवा अंगावर पडून महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 31, 2017 17:13 IST2017-05-31T17:13:17+5:302017-05-31T17:13:17+5:30

वीज नसल्याने घरात उंचावर रॉकेलचा दिवा लावलेला होता

The woman died due to a lightning shoe, and the woman died | उंदराच्या धक्क्याने पेटता दिवा अंगावर पडून महिलेचा मृत्यू

उंदराच्या धक्क्याने पेटता दिवा अंगावर पडून महिलेचा मृत्यू

उंदराच्या धक्क्याने पेटता दिवा अंगावर पडून महिलेचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 31 - पेटता दिवा अंगावर पडून जळाल्याने उपचार घेणा:या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काथर्दा, ता.शहादा येथे घडली. शहादा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कार्थदा येथील कल्पनाबाई दिलीपसिंग गिरासे (35) ही महिला  घरात झोपलेली होती. वीज नसल्याने घरात उंचावर रॉकेलचा दिवा लावलेला होता. मध्यरात्री उंदराच्या धक्याने पेटता दिवा कल्पनाबाई गिरासे यांच्या अंगावर पडला. त्यात त्यांच्या साडीने पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्या. त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत चंद्रसिंग दगा गिरासे यांनी खबर दिल्याने शहादा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The woman died due to a lightning shoe, and the woman died