निधीअभावी विहिरींचे अनुदान रखडल्याने शेतकरी हवालदिल

By Admin | Updated: May 15, 2017 12:33 IST2017-05-15T12:33:08+5:302017-05-15T12:33:08+5:30

संबंधित विभागाने लाभाथ्र्याना विहिरीचे बांधकाम पूर्ण होवूनदेखील उर्वरित रक्कम अदा न केल्यामुळे संबंधित लाभार्थ्ीनी नाराजी व्यक्त केली आहे

Withholding the subsidy for the well being, the farmer havalil | निधीअभावी विहिरींचे अनुदान रखडल्याने शेतकरी हवालदिल

निधीअभावी विहिरींचे अनुदान रखडल्याने शेतकरी हवालदिल

ऑनलाइन लोकमत

वाण्याविहीर, जि. नंदुरबार, दि. 15 -  नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या विशेष कृती कार्यक्रमांतर्गत 2006-2007 मधील अक्कलकुवा तालुक्यात  विहिरींचे खोदकाम करण्याकामी पहिला हप्ता दिला. मात्र संबंधित विभागाने लाभाथ्र्याना विहिरीचे बांधकाम पूर्ण होवूनदेखील उर्वरित रक्कम अदा न केल्यामुळे संबंधित लाभार्थ्ीनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील दुर्गम भागातील वडफळी, मोवाण, मोरखी, पांढरामाती, मोकस, बगदा आदी गावात सन 2006-2007 मध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा समितीने विशेष कृषी कार्यक्रमांतर्गत एका लाभार्थाला प्रशासकीय मंजुरी एक लाख 45 हजार 100 व शासकीय निधी एक लाख 37 हजार 845 रुपये काम सुरू करण्यासाठी मंजूर केले. विहिरीेंचे काम सुरू करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून 62 हजार 30 रुपयेदेखील अदा करण्यात आले.
या वेळी मोलगी कार्यालय व पंचायत समिती अक्कलकुवा येथील अधिका:यांनी गाव पाडय़ांवर जावून शेतक:यांच्या शेतात विहिरींचे खोदकाम व बांधकामाविषयी संबंधितांना सूचना देत मोजमाप करून घेतले. त्यानंतर मात्र तब्बल 10 वर्षानंतरही अर्थात 2007 पासून अद्यापर्पयत वडफळी, मोवाण, मोरखी, पांढरामाती, मोकस, बगदा या दुर्गम भागातील गावाच्या पाडय़ांवरील विहिरींच्या लाभाथ्र्याना उर्वरित अनुदानाची रक्कम न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व अक्कलकुवा पंचायत समितीच्या कार्यालयात लाभार्थी अनुदान मिळविण्यासाठी वेळोवेळी चकरा मारीत असून, त्यांना कोणी थारा देत नाहीत. उर्वरित रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.
 अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील शेतक:यांना 10 वर्षापासून विहिरीचा दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. संबंधित अधिकारी शेतक:यांना थारा देत नाही. यामुळे खेडय़ापाडय़ातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Web Title: Withholding the subsidy for the well being, the farmer havalil