शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर ॲण्टिबाॅडीज तपासणी करायची कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

सुनील कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : काेरोनाची लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज तपासणी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. कोरोना ...

सुनील कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टे : काेरोनाची लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज तपासणी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किती प्रमाणात अँटिबॉडीज वाढल्या, याची उत्सुकता असल्याने अँटिबॉडीज करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अँटिबॉडीज तपासण्याची आवश्यकता नसल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील चार लाखांपर्यंत नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण मिळते. मात्र अँटिबॉडीज तपासायची गरज नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील लसीकरण

पहिला डोस : ३९२८३२

दोन्ही डोस : ७१७२८

एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण : ३१.१०%

मुले व ज्येष्ठांची संख्या जास्त

कोरोनाची लागण होऊन गेली आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी अँटिबॉडीज टेस्ट करणाऱ्या लहान बालकांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच ज्येेष्ठ नागरिकांची संख्याही अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

रोज २० च्यावर तपासण्या

शहरात असलेल्या खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये दररोज २० पेक्षा अधिक नागरिक अँटिबॉडीज तपासणी करत आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत म्हणून अँटिबॉडीज तपासणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढल्यानंतर अँटिबॉडीज तपासणी संख्येत वाढ झाली आहे.

तपासणी करायची गरज नाही

कोरोनाची लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज तपासण्याची कोणतीही आवश्यकता नाही. केवळ उत्सुकता आहे म्हणून अँटिबॉडीज टेस्ट करणे चुकीचे आहे. दोन्ही डोस घेतले तरी बेफिकिरी दाखवू नये. कोरोना नियम पाळणे गरजेचे आहेच. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कराच.

- डॉ. के.डी.सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक