अंबारीबार शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:36 PM2019-12-16T12:36:43+5:302019-12-16T12:37:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : समाजातील वंचित घटकापर्यंत पोहचून त्यांना मदत करणे या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ नंदनगरी यांनी ...

When the tribulation comes, the Lord remembers - Ratnasundarasuri | अंबारीबार शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

अंबारीबार शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : समाजातील वंचित घटकापर्यंत पोहचून त्यांना मदत करणे या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ नंदनगरी यांनी अक्कलकुव्यातील अतिदुर्गम अशा अंबारीबार येथील जिल्हा परिषद शाळेतील ४७ विद्यार्थ्यांना लेखानसाहित्यासह स्कूलबॅग, खेळ साहित्य व गावातील गरजुंना ब्लँकेटस्चे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रितेश बांगड यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मुलांशी संवाद साधतांना समाजातील प्रत्येक घटकाला चांगले जीवन जगण्याचा व चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. यासाठी गरज लागल्यास आम्हास हाक द्या असे सांगितले तर रोटरीयन फकरूद्दीन जलगांववाला यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्कूलबॅग मुलांना वाटप केल्या व खऱ्या गरजुंपर्यंत पोहोचता आल्याने समाधान व्यक्त करून मुलांना केकचे वाटप केले.
विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या पुष्पगुच्छानी अतिथींचे स्वागत केले. या वेळी रोटरीयन मुर्तूजा बोहरा, अली मर्चंट, कॉन्ट्रॅक्टर कुणाल फटकाळ, केंद्रप्रमुख रमण बिºहाडे, केंद्र समन्वयक जगदीश पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन राकेश आव्हाड तर आभार भारती रनाळकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक मुंगल्या वळवी, मानसिंग वळवी, दिलीप वळवी, कर्मा वळवी, जेठ्या वळवी, दिनेश वळवी, कांतीलाल वळवी, गणेश वळवी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: When the tribulation comes, the Lord remembers - Ratnasundarasuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.